- तरुणाचा जागीच मृत्यू; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- अज्ञात आरोपींनी तरुणावर हल्ला चढवला. आरोपींनी त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यात त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनस्थळावरून पोलिसांनी मृत तरुणाची दुचाकी आणि चप्पल जप्त केली. भोसरीतील लांडगेआळी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ सोमवारी (दि. २६) सकाळी ही घटना उघडकीस आली.
अमन सुरेश डांगळे (वय २७, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.