- कोयता हातात घेऊन परत सोशल मीडियावर पोस्ट; पुन्हा गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- पोलिसांनी इंगा दाखवून, आकुर्डी दुर्गानगर येथून हातात बेड्या घालून धिंड काढूनही त्यातून कोणताच ‘सबक’ न शिकलेल्या सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय २१, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) याला पुन्हा एकदा कोयता घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काळेवाडीतील एका नगरसेवकाच्या कार्यालय परिसरातून यमभाईला गुंडा विरोधी पोलीस पथकाने पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याच्याकडून आणखी एक कोयता हस्तगत केला आहे.
‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात’, असा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर मागे एकदा व्हायरल केला होता. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी रामदास मोहिते यांनी सोमवारी (दि. २) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.