- नागरिकांच्या तक्रारींचे होणार तत्काळ निवारण..
- जनता दरबाराच्या वेळापत्रकासाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रारींचे निवारण न झाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालयात न जाता जनता दरबारात जाऊन आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत.परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या बाबत माहिती दिली.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या हद्दीत प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला ठराविक वार नेमून देण्यात आला आहे. संबंधित दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजताच्या कालावधीत पोलीस उपआयुक्त जनता दरबार घेतील.
सोमवार – सांगवी पोलीस स्टेशन
मंगळवार – तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व शिरगाव पोलीस चौकी यांचा दरबारात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे होईल.
बुधवार – देहूरोड पोलीस स्टेशन, रावेत पोलीस चौकी यांचा दरबार देहूरोड पोलीस स्टेशन येथे होईल.
गुरुवार – चिखली पोलीस स्टेशन
शुक्रवार – हिंजवडी पोलीस स्टेशन
शनिवार – वाकड पोलीस स्टेशन