- ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा मोफत डोस उपलब्ध…
- अधिकृत लसीकरण केद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थींना उद्या गुरुवारी (दि. ०५) रोजी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, कासारवाडी दवाखाना, जुने जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना या कोविड या लसीकरण केंद्रावर मिळेल. यात पहिला डोस हा १०० व दूसरा डोस १५० असा एकुण लाभार्थी क्षमता २५० असणार आहे. त्यातील पहिला डोस हा २० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ८० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दूसरा डोस हा १३० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व २०लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे मिळेल.
तसेच उद्या ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी पहिला डोस एकुण लाभार्थी क्षमता १०० त्यातील २० लाभार्थी हे कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ८० लाभार्थी यांना पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे डोस मिळेल. हे डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलाव शेजारी साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी रुपीनगर ठाकरे शाळा प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, नेहरुनगर उर्दु शाळा मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी, सखुबाई गार्डन, भोसरी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग निळु फुले नाटयगृह, पिंपळेगुरव बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. शंकुतला शितोळे शाळा, वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर सेक्टर नं. २९, आठवडाबाजाराजवळ, रावेत फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन येथे मिळतील.
उद्या फक्त वय ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. पहिला डोस क्षमता ५० व दुसरा डोस क्षमता १५०
एकुण लाभार्थी क्षमता २०० असणार आहे. यातील पहिला डोस हा ४० ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणी पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येणार आहेत.
हे डोस संजयकाळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर घरकुलदवाखाना चिखली पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर भानसे स्कुल, यमुनानगर तळवडे समाज मंदीर शाळा दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी मनपा शाळा खराळवाडी क्वालिटी सर्कल, भोसरी गंगोत्रीपार्क, दिघी नवीन भोसरीरुग्णालय सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम) पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकरवस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा पिंपळे गुरव माध्यमीक शाळा गणेश इंग्लि श स्कुल, दापोडी पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड मनपा शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर मिळतील.
तसेच कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर देण्यात येईल. त्यासाठी पहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता २०० असणार आहे त्यातील पहिला डोस हा २० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ८० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा ९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल. यासाठी पहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता ३०० असणार असून त्यातील पहिला डोस हा १०० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे तर दुसरा डोस हा २०० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे डोस देण्यात येणार आहेत.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ०५/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट,बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रावर दि.०५/०८/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.