- दोन कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा अपहार; रहाटणीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- फिर्यादी आणि इतर ६४ जणांचा उचल भिशी लावण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून त्यांच्याकडून दोन कोटी चार लाख २४ हजार ११० रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपी घर सोडून पळून गेले. ६५ जणांकडून घेतलेल्या कोट्यावधी रुपयांचा अपहार करून आरोपींनी फसवणूक केली.
हा प्रकार सन २०१९ ते २८ जून २०२१ या कालावधीत सज्जनगड कॉलनी रहाटणी येथे घडला. महेश बाबुराव घाटे (वय ३७, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
परशुराम सातपुते (वय ५०), सागर सातपुते (वय ३८), महिला आरोपी (वय ४५, सर्व रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहे.