- एकाला अटक; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- भोसरीतील गवळीमाथा येथील शालीमार स्टीलच्या दुकानात मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास आरोपी त्याच्या तीन साथीदारांसोबत रिक्षातून आला. त्याने फिर्यादी यांना सुऱ्याचा धाक दाखवला. तसेच फिर्यादी यांचा भाऊ याच्या पायावर रिक्षाचे चाक घालून त्यांना जखमी केले.
त्यानंतर आरोपींनी दुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले एक लाख दहा हजार रुपये किमतीचे स्टील मटेरियल जबरदस्तीने चोरून नेले. अस्लम आशीकअली चौधरी (वय ३१, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल रमेश पवार (रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, वाकडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.