- कोयत्याने मारण्याची धमकी; पतीविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- फिर्यादी या त्यांच्या आईच्या घरातून त्यांच्या बहिणीकडे पायी भाटनगरकडे जात होत्या. त्यावेळी पिंपरी पुलावर त्यांचा पती जवळ आला. तू आपल्या घरी चल, असे म्हणाला. त्यानंतर त्याने पत्नीला घरी नेले.
तेथे शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या उजव्या हातावर दगडी पाटा मारून जखमी केले. तसेच डोक्याचे निम्मे केस कात्रीने कापून कोयत्याने मारण्याची धमकी दिल. भीमनगर, पिंपरी येथे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
अमृता नरेंद्र वाल्हेकर (वय २३, रा. मिलिंद नगर, पिंपरी) यांनी बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पती नरेंद्र राजू वाल्हेकर (वय २७, रा. भीमनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.