- एकाच दिवशी तब्बल सहा दुचाकी चोरींच्या तक्रारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात सहा वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. आहेत. अज्ञात चोरट्याविरोधात शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ०५) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरीतील यशवंतनगर येथे टाटा मोटर्स कंपनीच्या हंगामी कामगारांच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी १६ जुलैला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. राजकुमार अग्नू जगताप (वय २५, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. देहू-आळंदी रोडवर चौधरी ढाब्यासमोर पाटील नगर, चिखली येथे २७ जुलैला सकाळी पावणे दहा ते दुपारी दीडच्या दरम्यान लॉक करून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. राजेश गणपत पाटील (वय ४०, रा. पाटील नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.उत्तम लहू खांडेकर (वय ३४, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खांडेकर यांनी त्यांची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंग मध्ये लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार मंगळवारी सायंकाळी पावणेसहा ते बुधवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान घडला. वाकडमध्ये राहत्या घरच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी २७ जून ते ४ ऑगस्ट दरम्यान चोरून नेली. क्षितिज हिमांशू राच (वय २८, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. देहूरोड येथे सुबान्नल्ला हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चोरून नेली. अब्दुल्लाह फारुख सय्यद (वय ३३, रा. थॉमस कॉलनी देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली पाच हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी २१ ऑक्टोबर २०२० ते ४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत चोरून नेली. प्रतिक प्रकाश गावडे (वय २६, रा. कृष्णा कॉलनी, लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.