- २७ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार..
- अर्जाचा भाग १ व भाग २ कधी भरायचा? वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील इ. ११ वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
या शहरांमध्ये अकरावीचे प्रवेश घेण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या शहरांमधील उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ भरायचा आहे. तर १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्जचा भाग २ विद्यार्थ्यांना भरायचा आहे. २७ ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा १४ ऑगस्ट, २०२१ पासून सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.