- मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; सेल्फीचा मोहही आवरेना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- पुण्यातील औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे. भाजपाच्या एका कार्यकर्त्याने हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. मंदिरासमोर अनेकजण आवर्जून फोटो काढून घेतानाही दिसत आहेत. काहींना सेल्फीचा मोहही आवरत नाहीय.
अनेकजण येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आलाय. या मंदिरातील मोदींच्या मूर्तीची उंची दोन फूट इतकी आहे.
मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागल्याचं सांगितल जातंय. नमो फाऊंडेशन’ च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. हे मंदिर उभारण्यासाठी दीड लाख खर्च करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण मंदिराचं लोकार्पण करण्यात आलंय.