न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- रोटरी क्लब ऑफ निगडी क्रीएटिव्ह कम्पोनट प्रा. लि. भोसरी व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने ” ग्रिन पिरियड”,” पॅड टू पॅड” तसेच महिलांचे जनजागृती व सक्षमीकरण करणे हा कार्यक्रम ग्रामपंचायत कुरुळी ( चाकण) या ठिकाणी दि. १४ ऑगस्ट रोजी सोशल डिस्टसिंग व करोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम समाज मंदिरात राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा कांबळे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे प्रेसिडेन्ट जगमोहन सिंग, क्रीएटिव्ह चे डायरेक्टर सुभाष जयसिंधानी, रविंद्र हिरेमठ,निना रामसोनी, मिनाक्षी घाटे, निर्मला कौर, बार्टीचे संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी,कुरुळी गावचे सरपंच शिल्पा सोनवणे, संत तुकाराम सहकारी करखाण्याचे संचालिका ताराबाई सोनवणे, ग्रामपंचायत सरपंच शोभा गायकवाड, ग्रामसेवक कविता कोतवाल, भैरवनाथ हायस्कूलचे चेअरमन एम. के.सोनवणे, पोलिस पाटील प्रतिभा कांबळे, शिवसेना महिला प्रमुख तेजस्विनी गुन्हे, मा.उपसरपंच विजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गुलाब कांबळे, रमाई महिला बचत गटाच्या स्वाती कांबळे, पंचशील महिला बचत गटाच्या सुजाता कांबळे, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्यूकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, राजेश गायकवाड आदि उपस्थित होते.
“पॅड टू पॅड” यांची माहिती निना रामसोनी यांनी दिली तर आहार, आरोग्य, स्वच्छता यांची माहिती निर्मला कौर व मिनाक्षी घाटे यांनी दिली. यावेळी अंगणवाडी सेविका, कर्मचारी, ग्रामपंचायत सेविका, बचत गटाच्या सदस्या, कुरुळी गावच्या १०० महिलांना “पॅड टू पॅड ” चे वितरण करण्यात आले.
चाकण कुरुळी औद्योगिक क्षेत्रातील कुशल मनुष्य बळाच्या गरजा ओळखून महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विकास बार्टी तर्फे संगीता शहाडे व प्रशांत कुलकर्णी यांनी स्वतः सहाय्यक युवागट तयार करणे, प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणास उपस्थित राहणे, समाज कल्यानच्या विशेष अनुदान योजणी, अनुसुचित जातितील बेरोजगार युवकांना उद्योजक बनविणे, बेरोजगार युवक युवतीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर योजना उपलब्ध करून देणे, उद्योजक बनविणे आदि माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन बाजीराव कांबळे, शोभा कांबळे, महिला सचिव माथर्डी ट्रास्पोर्ट पुणे जिल्हा, व गोपाल कांबळे यांनी आभार मानले.