- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून शाळेच्या आवारातच कर्मचाऱ्याला चोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- त्रिवेणीनगर येथील सेंट अॅन्स स्कूलच्या संस्थाचालकांनी फी व इतर कारणामुळे पालकांना अडचणीत आणले आहे. पालक संघ शाळेत जाब विचारण्यास गेला तर, त्यांनाही शाळेत येण्यास मनाई केली जात असल्याची माहिती पालकांनी दिली.
शिक्षण अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन पालक आज सोमवारी (दि. २३) रोजी मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला, डोनेशन व इतर बाबींसाठी शाळेत गेले असता, पालकांना गेटवरच अडवून त्यांना आत येण्यास मज्जाव केला. संचालकांच्या मुलाने पालक व महिलांना शिवीगाळ केली. पोलीसांनाही गेटच्या बाहेर काढले.
शाळेच्या या हुकुमशाही विरोधात शिवसेनेचे शहर संघटक रावसाहेब थोरात यांनी शाळेच्या आवारातच शाळेच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला. तसेच यापुढे शाळेची मनमानी चालणार नाही. पालकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शिवसेना स्टाईलने हिसका दाखविला जाईल, असा इशाराही दिला.
याबाबत संस्था चालकांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.