- उर्से ते वरवे-सातारा ६८ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ३१०० कोटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२१) :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडच्या कामाला शासनाने गती देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत पुण्याच्या पश्चिम भागातील रिंगरोडला मान्यता देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात उर्से ते वरवे सातारा रोड या एकूण ६८ किमी लांबीच्या रस्त्याच्या अहवालास शासनाने मान्यता दिली आहे. याकरिता तब्बल ३१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी १२ हजार १७६ कोटी एवढ्या प्रकल्प किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पुणे पश्चिम रिंगरोड भूसंपादनासाठी १४३९.६५ कोटी, सेवा वाहिन्या हस्तांतरासाठी ३२८.८२ कोटी व बांधकाम कालावधीतील कर्जावरील व्याज रुपये १३३१.८३ असे एकूण ३१००.३० कोटी रुपये इतकी रक्कम शासनाकडून उपलब्ध करून देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.