- मात्र प्रियकराचा सबंध तोडण्यास नकार; अखेर विवाहितेची आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- विवाहित महिलेने प्रियकराने केलेल्या मारहाणीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत २६ वर्षीय महिलेचे आणि मुख्य आरोपीचे अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीला ही बाब कळली. पतीने महिलेची समजूत काढली. महिलेने पुन्हा असे प्रकरण कानावर येणार नाही असे वचन पतीला दिले.
मयत महिलेचा प्रियकर समजून घेत नव्हता. आरोपीने मयत प्रेयसीला मित्र आणि महिलेच्या मदतीने मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केल्याने मयत प्रेयसी दुखावली. याच कारणावरून २६ वर्षीय महिलेने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
महिलेला दोन मुलं आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने देहूरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. प्रियकरासह महिला आणि तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी प्रसाद गायकवाड, रितेश भालेराव यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. महिला अद्याप फरार आहे.