न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- रावेत पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यास राज्य शासनाच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर अन्य साहित्यासाठी देखील मंजुरी दिली आहे. यासाठी १५,५४,५०० इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या रावेत पोलीस स्टेशनसाठी एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार, १४ पोलीस नाईक, १७ पोलीस शिपाई अशी ४० पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.