- बँकेकडून इसमाविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- भोसरीतील लांडेवाडीत टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखेत रिसायकल मशीन एटीएममध्ये आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आरोपीने दोनशे रुपये किमतीच्या पाच बनावट नोटा मशीन द्वारे त्याच्या खात्यावर जमा केल्या.
हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आला. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक संतोष काळे यांनी बुधवारी (दि. ८) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख फैसल ईब्राअहमद (रा. वास्तुउद्योग हाउसिंग सोसायटी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या खातेदाराचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.