- सर्वसाधरण सभेत नवीन स्थायी सदस्याच्या नावाची घोषणा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२१) :- शहर भाजपने रवी लांडगे यांचा राजीनामा मंजूर करून नवीन सदस्य नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. लांडगे यांचा समिती सदस्याचा राजीनामा तब्बल सहा महिन्यांनी महापौर उषा ढोरे यांनी मंजूर केला आहे.
त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागी २० सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. मागील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर सदस्य निवडीचा विषय होता. मात्र, तो ऐनवेळी सत्ताधाऱ्यांकडून गायब करण्यात आला होता.
लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून वारंवार १६ सदस्यांचा उल्लेख होत आहे. मात्र, रवी लांडगे यांनी राजीनामा देऊनही त्यांच्याही नावाची चर्चा होत होती. ही बाब अंगलट येणारी असल्याने ६ महिने या जागेवर कोणाची नियुक्ती न करणाऱ्या भाजपने अखेर त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.