- आरोपीची महिलेला निवृत्त एसीपी असल्याची बतावणी; सांगवीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- महिला शिक्षिकेला पैश्यांची अडचण होती त्यांनी आरोपीकडे पैश्यांची मागणी केली. आरोपीने दरमहा दहा टक्क्यांनी व्याजाने पैसे देतो असे सांगत पीडित महिलेला घरी बोलावले. दोन कोऱ्या चेकवर आणि कागदावर सह्या घेतल्या. पीडितेला सॉफ्ट ड्रिंक प्यायला दिले आणि पीडितेवर बलात्कार केला.
त्यानंतर पीडितेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून महिलेला पैसे न देता पाठवून दिले. या घटनेमुळे पीडित शिक्षिका घाबरली. पीडित महिला कार्यरत असलेल्या शाळेत आरोपी गेला. तिथे पीडितेला विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवले व शाळेत आणि घरच्या व्यक्तींना फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.
दरम्यान, आरोपीने पीडितेला दुचाकीवर बसवून घरी नेले. बदनामी होईल या भीतीने पीडित शिक्षिका दुचाकीवर बसली. तिला आरोपी घरी घेऊन गेला, तिथे पुन्हा जबरदस्ती करत बलात्कार केला. आरडाओरडा केलास तर मारून टाकेन, अशी धमकी दिली. “तू जर हे घरी सांगितलंस तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. मी निवृत्त एसीपी आहे, कोणी ही माझे काही करू शकत नाही”, असं देखील आरोपी म्हणाल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय शिक्षिकेने सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. विकास अवस्ती असं आरोपीचे नाव आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करत आहेत.