- अल्पवयीन आरोपींकडून दुकानात धुडगूस; एकावर चॉपरने हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२१) :- पिंपरीतील मिस्टर मॅड या कपड्यांच्या दुकानात तीन आरोपी आले. आम्हाला पैसे द्या, नाहीतर येथे धंदा करू देणार नाही, असे आरोपी म्हणाले. त्यानंतर लोखंडी चॉपरने फिर्यादीवर वार केले.
तसेच फिर्यादीसोबत काम करणाऱ्या इसमांना जखमी केले. दुकानामधील डिस्प्ले काच, काऊंटरवरील काच व पुतळ्यांची तोडफोड करून आरोपींनी नुकसान केले. तोडफोड करून आरोपी पळून गेले. पिंपरीतील मुख्य चौकांपैकी एक असलेल्या डिलक्स चौकात सोमवारी (दि. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास भरदिवसा हा प्रकार घडला.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू आहे. कासिम अस्लम शेख (वय २६, रा. पिंपरी) यांनी मंगळवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.