न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- चिंचवडगावतील रस्टन कॉलनी येथील सौ. मंगला रमाकांत सौंदणकर यांचे बुधवारी (दि. १५) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या मनमिळावू व मृदू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्यामागे पती, मुलगा, सून, दोन मुली, जावई, दोन नातू, दोन नाती असा परिवार आहे. शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक तथा पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांच्या त्या आई होत.