- १२ वर्षीय मुलावर सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- सांगवी परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करीत अत्याचार केला आहे. ही घटना इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली आहे.
चार वर्षीय मुलाने घडलेला प्रकार त्याच्या बहिणीला सांगितला. बहिणीने पीडित मुलाच्या आईला याची माहिती दिली. पीडित मुलाच्या आईने पतीला याची माहिती दिली. त्यानंतर, बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार १२ वर्षीय मुलावर सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुलांच्या कुटुंबातील सदस्य हे उच्च शिक्षित आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येडे हे करत आहेत.