- २ आणि ३ बीएचके सदनिकांच्या या गृहप्रकल्पाचे झाले नुकतेच उद्घाटन..
- परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांसाठी मोठी पर्वणीच – उद्योजक वसंत काटे….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- बांधकाम क्षेत्रातील अग्रणी यशदा रिअॅलिटी ग्रुपच्या वतीने पिंपरीतील ‘ यशदा फ्लोरेन्झा ‘ या गृहप्रकल्पाचा माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संतोष वाघेरे, सुरेश वाघेरे, साहेबराव वाघेरे, यशदा रिअॅलिटी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे, संचालक सूर्यकांत जाधव, संचालक विजय काटे, मार्केटिंग विभागाचे रोहिदास गवारी, निरंजन भातुलकर आदींसह ग्राहक उपस्थित होते.
पिंपरी आणि पिंपळे सौदागर या दोन्ही गावांच्या सीमेलगत श्री हरी चौक, पिंपरी वाघेरे येथे हा प्रकल्प साकारत आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठसह अनेक महत्त्वाचे ठिकाणे या प्रकल्पापासून जवळच्या अंतरावर आहेत. २ आणि ३ बीएचके सदनिकांचा समावेश असलेला हा गृहप्रकल्प परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. उद्घाटनानिमित्त ग्राहकांना मूळ किमतीवर खात्रीशीर सवलत आणि खास भेटवस्तूचा लाभही देण्यात आला.
याबाबत माहिती देताना वसंत काटे म्हणाले, यशदा ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी अद्ययावत तंत्राचा वापर करून अनेक प्रकल्प साकारले आहेत. ग्राहकांना आधुनिक आरामदायी जीवनशैलीचा अनुभव देत असतानाच परवडणाऱ्या दरात दर्जेदार घरे देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. या गृह प्रकल्पांतर्गत ग्राहकांना भव्य प्रवेशद्वार, सुरक्षा रक्षक व्यवस्था, सामाईक ठिकाणी एलईडी बल्बची व्यवस्था, सिमेंट रस्ते, स्वयंचलित एलेव्हेटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, जनरेटर बॅकअप, सौरऊर्जेवरील गरम पाणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सीसीटीव्ही, टीव्ही केबल कनेक्शन, मल्टीपर्पज हॉल, मुख्य स्वयंपाक घरासाठी किचन ट्रॉली, जीम, भव्य गार्डन, मुलांना खेळण्यासाठी जागा, व्हिडिओ डोअर फोन, झुम्बा डान्स फ्लोअर आदी सुविधा ‘ यशदा फ्लोरेन्झा ‘ गृहप्रकल्पात सामावल्या आहेत. अन्य प्रकल्पांप्रमाणे हा गृहनिर्माण प्रकल्पही ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.