- एकाला अटक; दोन महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- हिंजवडीतील अनंतानगर येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास पोलिसांनी लॉजवर छापा मारला.
आरोपीने एकाच्याकडून वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना प्रवृत्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून त्यावर त्याने आपली उपजीविका भागवली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.
लखन उर्फ सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मंगेश मनोहर सूर्यवंशी (वय २५, रा. आनंतानगर, क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो लॉजवर, हिंजवडी. मूळ रा. उदगीर, जि. लातूर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.