न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- चिंचवडगावातील चाफेकर चौक ब्रिजवरील गतिरोधकावर १४ सप्टेंबर रोजी दुचाकीने जम्प केली. यात तरुणाची आई दुचाकीवरुन खाली पडली. त्यात त्यांच्या डोक्यास आणि गुडघ्याला दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तरुणाच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलाच्या हयगयीमुळे हा अपघात झाला.
महिलेच्या मृत्यु प्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार रामदास बापु नरवडे यांनी रविवारी (दि. १९) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत मोतीराम गोरे (वय ३७, रा. पुनावळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.