- निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- ‘टाटा मोटर्स पीसीबीयू व सीव्हीबीयू युनिट्स ऑफ द टीएमएल’ या कंपनीमधील माथाडी कामगारांना देत असलेले दरपत्रक दाखव. नाहीतर तुझ्याकडे बघून घेऊ. आत्ता आम्ही पाचजण आलोय. उद्या १०० ते २०० जणांना घेऊन येतो का नाही ते बघ’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीकडे महिन्याला पन्नास हजारांची खंडणी देण्याची मागणी केली.
पैसे न दिल्यास कंपनीत काम करू देणार नाही. ठेकेदारी बंद पाडून टाकू आणि दुस-यांना काम दिले तर त्यांना व फिर्यादीकडे बघून घेऊ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादीच्या ऑफिसमध्ये प्रवेश करून फिर्यादीला शिवीगाळ करत ऑफिसमधील सामानाचे नुकसान केले. ऑफिसमधील महिलांसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंगही केला. ही घटना ६ सप्टेंबर रोजी चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील प्राज कंपनीज लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा ली येथे घडली.
संजय लहुराव बांदल (वय ५४, रा.संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ शेवाळे, उत्तम शिंदे, विक्रम मोरे, अमोल तावरे, अजित जैद (सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.