- खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांचा अंदाज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- चिखलीमधील नेवाळे वस्ती येथे गणेश सिद्धी पार्कमध्ये एका इसमाचा मृतदेह आज मंगळवारी (दि. २१) रोजी सकाळी आढळून आला आहे.
चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रथमदर्शनी खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. वीरेंद्र वसंत उमरगी (वय ४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.