न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- देहूरोड आणि निगडी येथून लॅपटॉप आणि चक्क डुकरांची चोरी करण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी (दि. २१) रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डुकरांच्या वाड्यातून ४५ हजार रुपये किमतीची २५ डुकरे चोरून नेली आहेत. हा प्रकार १० सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेपाच वाजताच्या कालावधीत देहूरोड येथे घडला. विनोद बलबीर चौंदे (वय ४०, रा. श्रीकृष्णनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल महेंद्र रीडलान (वय २४, रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून २० हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २१) सकाळी आठ ते सव्वानऊ वाजता घडली. ऋषभ विजय मांडवगडे (वय २५, रा. प्राधिकरण निगडी. मूळ रा. नागपूर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.