- पोलिसांकडून एकाला अटक दुसरा फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- भोसरीतील दिघी रोड येथे जय तुळजाभवानी स्नॅक्स सेंटर या हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी आले. त्यातील एका आरोपीने तो भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. तर दुसरा आरोपी हा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असल्याचे सांगितले.
आरोपींनी फिर्यादीकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. श्याम अंकुश शिंदे (वय २८, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर मालूजीराव ताटे (वय ३३, रा. गवळी नगर, श्रीराम कॉलनी, भोसरी) असे अटक केलेल्या तोतया पोलीस इन्स्पेक्टरचे नाव आहे. त्याचा साथीदार माम्या वैरागे (वय अंदाजे ३०, रा. गवळीनगर, श्रीराम कॉलनी, भोसरी) पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.