- वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- आकुर्डीतील खंडोबा चौक येथील तपस्वी प्लाझात सौलस्प्रिंग बॉडीकेअर स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून स्पा सेंटरवर छापा मारला.
आरोपींनी सात महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. वेश्या व्यवसायाच्या पैशांतून त्यांची उपजीविका भागवत होते. पोलिसांनी सात महिलांची सुटका केली आहे. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्पा सेंटर मालक मनीष गोला (वय अंदाजे २९, रा. बिजलीनगर, चिंचवड), स्पा सेंटरचा मॅनेजर विकास आबासाहेब पाटील (वय २७, रा. तंगवाना, पो. महाळशेवगे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.