- त्या सदस्यांना २९ सप्टेंबरपर्यंत हजर राहण्याचे फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या १५ सदस्यांना एसीबी ने नोटीस पाठवली असून २९ सप्टेंबर पर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सीमा मेहंदळे यांनी दिली आहे.
१८ ऑगस्ट रोजी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जण लाच स्वीकारताना एसीबी च्या जाळ्यात अडकले होते. या प्रकरणी त्यांना एसीबी ने अटक केली होती. या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप पुढे आली असून त्याच संदर्भात १५ सदस्यांची चौकशी होणार असल्याचे एसीबी सूत्रांनी सांगितले आहे.
एसीबी केलेल्या कारवाईनंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक), राजेंद्र जयंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भीमराव काळे (शिपाई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.