- पतीने महिलेच्या चारित्र्यावर घेतला संशय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- पतीसोबत भांडण झाल्याने महिला काही दिवसांपासून मुलासोबत रावेत येथील जाधववस्ती येथे राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून महिला घराबाहेर आली नाही अशी माहिती शेजारी राहणा-या महिलेने एकाला दिली. बुधवारी रात्री महिलेच्या घरी आले असता सबंधित महिला जमिनीवर पडली होती. महिलेच्या तोंडातून फेस येत होता.
पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी पतीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण केले. महिला मुलाला घेऊन रावेत येथे राहण्यास आल्याच्या रागातून पतीने वस्त्राच्या नाडीने गळा आवळून पत्नीचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार बुधवारी (दि. २२) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.
खैरून बी उर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय ३८, रा. जाधव वस्ती, रावेत) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मलिक शेंकुबर नदाफ (वय ३९, रा. अक्कलकोट एमआयडीसी, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, पुणे. मूळ रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस आणखी तपास करीत आहेत.