- महिलेकडून प्रतिकार; चोरट्याने केले गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- वाकडच्या ओमेगा सोसायटी येथील महिला १२ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास चालण्यासाठी गेल्या असताना अनोळखी चोरट्याने मागून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेने चोरट्याला प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांना मारहाण करून रस्त्यावरील वस्तूने मानेवर मारून जखमी केले.
महिलेला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेखा ज्ञानेश्वर गिरमे (वय ६६, रा. पोस्टल कॉलनी, वाकड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २२) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.