- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२१) :- लोणावळा येथे नौदलात कर्तव्यावर असताना तरुणाने ऑनलाइन जाहिरात पाहून आरोपींना फोन केला. त्यांनी दोन महागडे मोबाइल फोन आणि हेडफोन फिर्यादी तरुणाला दोन लाख १५ हजार ३०० रुपयात देण्याचे ठरले.
संशयित आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यावर तरुणाने पैसे पाठविले. मात्र पैसे दिल्यानंतरही संशयित आरोपींनी त्यांना साहित्य दिले नाही. १४ जुलै ते १० ऑगस्ट २०२१ दरम्यान ही घटना घडली.
मयुर शिरीष कोल्हे (वय २३, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी शनिवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अर्णव (पूण नाव, पत्ता माहिती नाही) आणि आयुष यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा लोणावळा पोलिसांकडे तपासाकरिता वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.