- भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्रशासनाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- चिंचवड स्टेशन येथील आद्य क्रांती गुरू लहुजी साळवे व क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम येत्या १४ नोव्हेंबरच्या आत पूर्ण करा, अशा सूचना भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
त्या म्हणाल्या, मी स्वतः पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले. त्यासाठी निधीची तरतूद केली. कोरोनामुळे हे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले होते. त्याला गती देणे आवश्यक आहे. नूतनीकरणाचे काम हे वस्ताद लहुजी यांच्या जयंतीदिनी (१४ नोव्हेंबर) पूर्ण व्हावे. याबाबत आयुक्तांना भेटून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सागितले.