- महिला वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपळे सौदागर येथील साई वास्तू हौसिंग-को सोसायटीत ९ वर्षीय मुलाला कारने चिरडले आहे. सोसायटीतील खेळाच्या मैदानात हा मुलगा इतर मित्रांसोबत खेळत होता. तेवढ्यात भरधाव वेगाने आय टेन कारने मुलाला चिरडले.
इनोश प्रदीप कसब असं जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रदीप प्रवर्तिक कसब यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल देशपांडे असे वाहनचालक महिलेचे नाव आहे. मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो गंभीर जखमी आहे.