- दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल; आकुर्डीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- आकुर्डीतील जय गणेश व्हिजनमधील ओम फायनान्समध्ये भिशीचा हिशोब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच, कॉलर पकडून ऑफिसच्या बाहेर काढले. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सचिन चंद्रकांत अवसरमल (वय २७, रा. वराडे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदाम दगडू आमटे (वय ४४) आणि जनार्दन दगडू आमटे (वय ३५) या दोन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.