- आयआरबीकडून टोलनाका आवारात फलकाद्वारे संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी व चांडोली टोलनाका आज शनिवारी (दि. ९) १२.०० वा. पासून बंद करण्यात आला आहे.
आयआरबी कंपनीने टोलनाका आवारात फलकाद्वारे टोलनाका बंद केल्याबाबत संदेश लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, ”सर्व वाहनधारकांना कळविण्यात येते की भारतीय राजपत्र (स 1305 गुरुवार 15 डिसेंबर 20 नुसार मोशी व चांडोली (राजगुरूनगर) या प्रकल्पाची 8 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 नंतर समाप्त होत आहे. त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (आय आर बी) कडून पथकर वसुली बंद करण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी”.