- पिंपरीतील विद्या निकेतन शाळेतील शिक्षक अनं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी येथील टाटा मोटर्स एज्युकेशनच्या विद्या निकेतन शाळेतील १९९८ च्या बॅचने नुकतंच विद्यार्थी मिलन साजरं केलं. यात जवळपास चाळीस विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला एज्युकेशनचे चेअरमन रविंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका बानी राय चौधरी आणि शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमात अनेक खेळ, गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामधे शिक्षिका आणि विद्यार्थीनी, विद्यार्थी यांनी भाग घेऊन आपल्यामधील दडलेल्या भावनांचा मार्ग मोकळा करुन दिला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना आणि सरस्वती पुजनाने करण्यात आली.
शाळेचे चेअरमन रविंद्र कुलकर्णी म्हणाले, आपल्या शाळेतील शिक्षीका या कायम मुलांच्या सार्वत्रिक विकासाचा प्रयत्न करत असतात आणि आम्ही कायम त्यांना मदत करत असतो.
शाळेच्या मुख्याध्यापिका बानी राय चौधरी म्हणाल्या, शाळेच्या सर्व उपक्रमात माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी खूप मोलाचे सहकार्य करीत असतात. आज मला विषेष आनंद होतो की आपल्या १९९८ च्या बॅचने आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सहभागी करून ऐक वेगळा आनंद घेण्याची संधी दिली.
विद्यार्थी प्रतिनिधी समीर कुलकर्णी यांनी शाळेत शिकत असताना आपण किती सुंदर दिवस अनुभवले आणि शाळेतील शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे आम्ही आज सामाजिक जीवनात वावरत असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या संस्काराची आठवण होत असल्याने आज आम्ही आपपल्या क्षेत्रात यशस्वी आहोत. आम्ही सर्व मिळून एक ट्रस्ट उभा करण्याचा विचार करत असुन त्या मधुन शाळेतील जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात किंवा जे विद्यार्थी खेळामध्ये प्राविण्य मिळवता अश्या विद्यार्थीनां मदत करता येईल.
या वेळी संस्थेच्या माँनिटर, इतर मदतनीस यांचा विषेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन समीर कुलकर्णी, रोहन घाटे, संहिता येवलेकर, तन्मय बॅनर्जी, असिफ शिकलगार, सोनाली शितोळे, अमित लोखंडे यांनी केले.