- शिवसेनेच्या रावसाहेब थोरातांची निवडणूक विभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- मतदार यादीच्या पुनरीक्षण कालावधीत जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी ज्या मतदाराचे वय १८ वर्ष किंवा जास्त आहे अशांनाच मतदार नोंदणी करता येते. मतदार नोंदणी नमुना ६ मार्गदर्शक सूचनामध्ये या बाबीचा अंतर्भाव आहे. निवडणूक विभागाची ही अट जाचक आहे.
त्याच वर्षी पुढील महिन्यात ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले अशांना मात्र त्या वर्षी मतदार नोंदणी करता येत नाही. पर्यायाने ते मतदार नोंदणीपासून वंचित राहतात.
निवडणूक विभागाने ही अट रद्द करून मतदार नोंदणीवेळी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण आहे, अशांचीही नाव नोंदणी मतदार यादीत करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी मागणी भोसरी विधानसभा शहर संघटक रावसाहेब थोरात यांनी भोसरी विभागाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.