- पिंपरीतील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२१) :- एका ५० वर्षीय व्यक्तीने ग्रेडसेपरेटरमध्येच उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आज सोमवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीतील पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीकडून चिंचवडकडे जाणाऱ्या पालिकेच्या शेजारील ग्रेडसेपरेटरवरील पुलावर हा प्रकार घडला आहे.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशामक केंद्राचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या हनुवटीला गंभीर जखम झाली असून मोठा रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच वेळ वाहतूक खोळंबली होती.