- पिस्टल अनं जिवंत काडतुसे जवळ बाळगने आले अंगलट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२१) :- मोशीतील हवालदार वस्ती परिसरातील चौधरी ढाब्याजवळ दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ८० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १०) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.
खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आर्म ऍक्ट ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला असून गौरव मच्छिन्द्र डोंगरे (वय २३, रा. बलुत आळी, चाकण), शंकर शिवाजी वाडेकर (वय ३०, रा. भांबोली, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.