- मृताची ओळख अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- ५० वर्षीय व्यक्तीने ग्रेडसेपरेटरमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या व्यक्तीच्या हनुवटीला गंभीर जखम झाली होती, तसेच मोठा रक्तस्त्राव झाला होता.
गंभीर अवस्थेतच त्या व्यक्तीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नव्हती.
सोमवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीतील पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीकडून चिंचवडकडे जाणाऱ्या पालिकेच्या शेजारील ग्रेडसेपरेटरवरील पुलावर हा प्रकार घडला होता.