- थेरगावातील घटना; अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- एका खासगी हॉस्पिटलसमोर पार्क केलेली रिक्षा एका तासाच्या आत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार थेरगावात घडला आहे. दुपारी एक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
एकूण ६२,३०० रुपये किमतीची रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद रोहित मधुकर वाघ (वय २४, रा. तापकीर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.