- झोपेतच पत्नीवर चढविला हल्ला; पत्नी गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- पती आणि त्याच्या पत्नीचे दोन दिवसांपूर्वी कानातील सोन्याची फुले परस्पर विकण्यावरून भांडण झाले. त्या भांडणाच्या कारणावरून सोमवारी पहाटे पतीने त्याची पत्नी झोपली असता तिच्या खांद्यावर, गळ्याजवळ, मानेवर वार करून तिला गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपी पतीने पलायन केले. हा प्रकार सोमवारी (दि. ११) पहाटे पाच वाजता नागसेन नगर झोपडपट्टी, बिजलीनगर येथे घडला. गुंडांम्मा मलकेश कांबळे (वय ३२, रा. वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नितीन रेवणसिद्ध बनसोडे (रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.