- कुणाल वाव्हळकर यांचा ७९ मतांनी पराभव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहर आरपीआयच्या शहराध्यक्षपदी स्वप्नील कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. स्वप्नील कांबळे आणि कुणाल वाव्हळकर या दोघांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडली.
एकूण २ हजार १५५ क्रियाशील सदस्यांपैकी १ हजार ४५४ जणांनी मतपत्रिकेद्वारे मतदान केले. ९ मते बाद झाली, त्यामुळे १४४५ पैकी स्वप्नील कांबळे यांना ७६२ तर कुणाल वाव्हळकर यांना ६८३ मते पडली. ७९ मतांनी कांबळे विजयी झाले.
पिंपरीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रभारी सूर्यकांत वाघमारे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.