- सासरा आणि मेहुण्यावर जावयाकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- पत्नी माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी फिर्यादी पती सासरी आला. त्यावेळी सासऱ्याने फिर्यादी जावयाला शिवीगाळ करून ‘तू परत कशाला आला’ असे म्हणत मारहाण केली.
मेहुण्याने घरातून मिरची पावडर आणून फिर्यादीच्या डोळ्यात टाकली अनं घरासमोर पडलेला दगड उचलून डोळ्याच्या भुवईवर, नाकावर मारून दुखापत केली. सोमवारी (दि. ११) सकाळी वाघेश्वर कॉलनी नंबर चार, मोशी येथे हा प्रकार घडला.
सुनील गणेश पोटे (वय ३५, रा. राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जालिंदर वाघमारे (वय ५३), अजय जालिंदर वाघमारे (वय २१, दोघे रा. वाघेश्वर कॉलनी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.