- दोन महिलांची सुटका; ३८ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरीतील डिलक्स मोबाईल मार्केट मॉलच्या पाचव्या मजल्यावर वेलनेस स्पा सेंटरमध्ये आरोपी महिला दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती.
पोलिसांनी मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सहाच्या दरम्यान छापा मारून कारवाई केली. दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटर चालवणाऱ्या ३८ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुबराव गवारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.