- हाताने, लोखंडी रॉडने दोघांना मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२१) :- मोशीतील वाघजाई दुध डेअरी येथे फिर्यादी हे रविवारी रात्री एकासोबत बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी बेकायदेशीरपणे डेअरीत प्रवेश करून फिर्यादी आणि एकाला हाताने, लोखंडी रॉडने मारून जखमी केले. फिर्यादीचा मोबाईल फोन हिसकावून नेला.
रविवारी (दि. १७) रात्री पावणे नऊ वाजता ही घटना घडली. शुभम रामदास बोराटे (वय २३, रा. वाघजाई मळा, बोराटेवस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आशिष सुनिल बोराटे (रा. बोराटेवस्ती, मोशी), महेश नरवडे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही), एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.