- एकाला लोखंडी रॉड मारहाण; चिखली पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- फुलेनगरच्या नेहराज मित्र मंडळाजवळ फिर्यादी आणि त्यांचा मित्र एकासोबत फिरत असताना आरोपींनी एकाचे नाव घेऊन ‘मी त्याचा मर्डरच करणार आहे. मी दोन मर्डर केले आहेत. तिसरा त्याचाच मर्डर करणार आहे. माझ्या खबरी पोलिसांना सांगतो’ असे म्हणत एकाला शिवीगाळ करून मारहाण केली.
लोखंडी रॉड मारण्यासाठी आरोपींनी उगारला असता फिर्यादीमध्ये आल्याने त्यांना रॉड लागून ते जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. १९) रात्री अकरा वाजता फुलेनगर येथे घडली.
सागर सदाशिव बनसोडे (वय २२, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजित केशव शिगवण (रा. फुलेनगर, चिंचवड) आणि त्याचे दाजी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.