- पिंपरीतील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी विना परवानगी शहरात आला होता. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत त्याने झटापट करून धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. २०) रात्री सात वाजता शेवाळे सेंटर झोपडपट्टी, पिंपरी येथे घडली.
विक्की उर्फ सोनू सतीश ठोकळ (वय २८, रा. शेवाळे सेंटर झोपडपट्टी, पिंपरी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विक्की ठोकळ याला पिंपरी – चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.
त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना त्याने फिर्यादी पोलीस नाईक बंड यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांच्यासोबत झटापट केली. तसेच मारण्याची धमकी दिली.